मराठीहिंदीEnglishবাংলাਪੰਜਾਬੀગુજરાતીநாடுదేశం
आमच्यासोबत जाहिरात करा
एक्स्प्लोर
लाईव्ह टीव्हीव्हिडीओशॉर्ट व्हिडीओवेब स्टोरिज्फोटो गॅलरीपॉडकास्टमुव्ही रिव्ह्यू
यूजफुल
होम लोन EMI कॅलक्यूलेटर बीएमआय कॅलक्यूलेटर वय मोजा/ वय कॅलक्यूलेटर एज्युकेशन लोन EMI कॅलक्यूलेटर कार लोन EMI कॅलक्यूलेटर पर्सनल लोन EMI कॅलक्यूलेटर पेट्रोलचे दर डिझेलचे दर
मुख्यपृष्ठकरमणूकSunjay Kapur Death: करिष्मा कपूरचे एक्स हसबँड बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन; हार्ट अटॅकनं निधन
Sunjay Kapur Death: बॉलिवूड अभिनेत्री करिष्मा कपूरचे एक्स हजबँड प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर यांचं निधन झालं आहे. पोलो खेळताना अटॅक आल्यानं त्यांचं निधन झाल्याचं सांगितलं जात आहे.
By : नामदेव जगताप|Updated at : 13 Jun 2025 06:45 AM (IST)
Bussinessman Sunjay Kapur Passed Away
Source : ABP Majha
Sunjay Kapur Death: बॉलिवूडची अभिनेत्री (Bollywood Actress) करिश्मा कपूरच्या (Karishma Kapoor) एक्स हजबँडचं निधन झालं आहे. फिल्मफेयरच्या रिपोर्टनुसार, यूकेमध्ये पोलो खेळत असताना हार्ट अटॅक आल्यामुळे प्रसिद्ध बिझनेसमन संजय कपूर (Businessman Sunjay Kapur) यांचं निधन झालं आहे. ते 53 वर्षांचे होते. धक्कादायक बाब म्हणजे, गुरुवारी झालेल्या अहमदाबाद प्लेन क्रॅशमध्ये मृत्यूमुखी पडलेल्यांसाठी श्रद्धांजली वाहणारी पोस्ट संजय कपूर यांनी केली होती. ती त्यांची अखेरची पोस्ट ठरली. अभिनेत्री करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवसोबत लग्नगाठ बांधलेली. दोघांना एक सात वर्षांचा मुलगा आहे.
अहमदाबाद विमान दुर्घटनेवर संजय कपूर यांची शेवटची पोस्ट
संजय कपूर यांची शेवटची पोस्ट 12 जून रोजी अहमदाबाद विमान अपघातावर होती. अहमदाबादमध्ये झालेल्या या दुःखद विमान अपघातात विमानातील फक्त एक प्रवासी वगळता सर्व प्रवाशांचा मृत्यू झाला. इतकंच नाही तर विमान रहिवाशी भागात कोसळलं, त्यावेळी तेथील काही स्थानिक लोकांनाही आपले प्राण गमवावे लागले. गुजरातचे माजी मुख्यमंत्री विजय रुपाणी यांचाही या विमान अपघातात मृत्यू झाला आहे
Terrible news of the tragic Air India crash in Ahmedabad. My thoughts and prayers are with all the families affected. May they find strength in this difficult hour. 🙏 #planecrash
— Sunjay Kapur (@sunjaykapur) June 12, 2025
या दुःखद अपघाताबद्दल शोक व्यक्त करताना संजय कपूर यांनी लिहिलेलं की, "अहमदाबादमध्ये एअर इंडियाच्या विमान अपघाताची दुःखद बातमी आहे. माझ्या संवेदना आणि प्रार्थना सर्व पीडित कुटुंबांसोबत आहेत. या कठीण काळात देव त्यांना शक्ती देवो."
करिष्मा कपूरसोबत झालेलं लग्न अन् नंतर घेतलेला घटस्फोट
बॉलीवूड अभिनेत्री आणि संजय कपूर यांचं 2003 मध्ये लग्न झालेलं. दोघांचं नातं फक्त 13 वर्ष टिकलं. 2016 मध्ये दोघांचा घटस्फोट झाला. करिश्मापासून घटस्फोट घेतल्यानंतर संजय कपूर यांनी अभिनेत्री प्रिया सचदेवशी लग्न केलं.
संजय आणि करिश्माला दोन मुलं आहेत. मुलगी बडी समायरा आणि मुलगा छोटा कियान. मुलगी आता 19 वर्षांची आहे. घटस्फोटानंतर दोन्ही मुलांचा सांभाळ करिश्मा कपूर करतेय. घरगुती हिंसाचाराच्या आरोपांनंतर करिष्मा कपूर आणि संजय कपूर यांचा घटस्फोट झाला होता.
संजय कपूर आणि प्रिया सचदेवला सात वर्षांचा मुलगा
प्रिया सचदेव आणि संजय कपूर गेल्या 8 वर्षांपासून एकत्र होते. संजय कपूर आणि प्रिया सचदेव यांना अझारियस नावाचा एक मुलगा देखील आहे. करिष्मा कपूरसोबत घटस्फोट झाल्यानंतर संजय कपूर यांनी प्रिया सचदेव यांच्याशी लग्न केलं. 2018 मध्ये दोघांना एका मुलाला जन्म दिला.
Published at : 13 Jun 2025 06:45 AM (IST)
Tags :
Karisma Kapoor BOLLYWOOD Sunjay Kapur
आणखी वाचा
Sponsored Links by Taboola
Advertisement
${data.labels.total_active_cases}
Active
${data.labels.total_recovered_cases}
Recovered
${data.labels.total_death_cases}
Deaths
${active}
Active
${recovered}
Recovered
${death}
Deaths
महत्त्वाच्या बातम्या
Advertisement
Advertisement
ट्रेंडिंग न्यूज
#Air India Plane Crash# Ahmadabad Plane Crash# Vijay Rupani# Sonam raghuwanshi
Advertisement
व्हिडीओ
फोटो गॅलरी
ट्रेडिंग पर्याय
निलेश बुधावले, एबीपी माझाप्रतिनिधी
दोन्हीकडचे कार्यकर्ते प्रचंड आशावादी, पण खरंच होणार का अखंड राष्ट्रवादी? Exclusive Report
Opinion
पर्सनल कॉर्नर
टॉप आर्टिकल
टॉप रील्स
Embed widget